Showing posts with label तुंबडीगीत. Show all posts
Showing posts with label तुंबडीगीत. Show all posts

29 Aug 2010

सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत

सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत
लख्खलख्ख लख्खलख्ख, तुंबडी का गाणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!

सांगतो मी एक बात, इकडं तुमी फ़िरा
आमच्यापाशी एक हाय, सचिन जैसा हिरा
भारला त्याने देश पुरा, जग येडेपिसे
शेनवार्नला स्वप्नामंधी, चौके-छक्के दिसे
कान द्या इकडं जरा, ऐकून तुम्ही घेणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!

दिसायला म्हणान तर, छोटी मूर्ती हाये
क्रिकेटचं सारं जग, त्येचा खौफ़ खाये
शतकांची गणती नाय, किती चौके-छक्के
अचंबित दुनियासारी, सारे हक्के-बक्के
देव्हार्‍यात पूजा त्याची, खांदी घ्यावा मेणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!

कधी ना खचला हिंमत, त्याचे नांव सचिन
माणूस व्हय का देव ह्यो, कांप्युटरी मशीन?
खेळापुढे कधी त्याने, मोजला नाही पैसा
भगवंताने द्यावा पुत्र, घरोघरी ऐसा
समद्यायच्या तोंडी नांव, सच्चिन-सच्चिन येणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!!

उत्तरेचा हिमालय, दक्षिणेचा सागर
सच्चिनच सारं जणू, अमृताची घागर
जिथं झडे पायधूळ, बॅट याची धडके
तिथं-तिथं तिरंगा, गौरवाने फ़डके
मानू नका नुस्ता देव, थोडी अभय कला घ्याणा
तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!! 
    
                                      गंगाधर मुटे
..................................................
 (तुंबडीगीत)  ,तुंबडी = एक भोपळा 

असलेले तंतुवाद्य / भिक्षापात्र.
..................................................