बळीराजाचे ध्यान ....!!
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥
कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥
तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥
कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥
नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥
आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥
राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥
गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
अतिशय उत्तम गंगाधरजी !!!!!!!!
ReplyDeleteशेतकर्याचे ध्यान एका शेतकर्यानेच वर्णावे, हे खरे बाकी..!
वाह ! मुटेजी,
ReplyDeleteअस्सल् मातीतली कविता !
सुरेख जमली आहे !
कास्तकाराच्या प्रति असलेल्या तुमचा कळवळा
यातून स्पष्ट दिसुन येतो !
vaa, vaaa, vaaaa ! Mute mahoday ,APRATIM SUNDAR TE DHYAN !
ReplyDelete