29 Aug 2010

पहाटे पहाटे तुला जाग आली

पहाटे पहाटे तुला जाग आली 

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली.......!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालू कानी, बोळे ते कळेना
असा राहू दे हात, माझ्या कानाशी ...!!

म्हणू घोरणे की, फुस्कारणे याला
कर्कश बेसुरांची, गुंफ़ितेस माला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली ...!!

जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी, ऑलाउट कशाला?
फुकटात सारी, मच्छरे पळाली ...!!

तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
अभय झोप सारी, चकनाचूर झाली ...!!

                                     गंगाधर मुटे
............................................................................
(विडंबन)                             (कविश्रेष्ठ सुरेश भटांचा क्षमाप्रार्थी)
............................................................................

No comments:

Post a Comment