29-Aug-2010

बळीराजाचे ध्यान ....!!

बळीराजाचे ध्यान ....!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                                   गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

3 comments:

 1. अतिशय उत्तम गंगाधरजी !!!!!!!!
  शेतकर्‍याचे ध्यान एका शेतकर्‍यानेच वर्णावे, हे खरे बाकी..!

  ReplyDelete
 2. वाह ! मुटेजी,
  अस्सल् मातीतली कविता !
  सुरेख जमली आहे !
  कास्तकाराच्या प्रति असलेल्या तुमचा कळवळा
  यातून स्पष्ट दिसुन येतो !

  ReplyDelete
 3. vaa, vaaa, vaaaa ! Mute mahoday ,APRATIM SUNDAR TE DHYAN !

  ReplyDelete