29 Aug 2010

गणपतीची आरती









गणपतीची आरती



जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥


                               गंगाधर मुटे
................................................

2 comments:

  1. सर्वच कविता छान आहेत .त्या नीट समजायला कवीच्याच कुवतीचा वाचक पाहिजे.एवढे मात्र मला समजले की स्वत:ला अभय म्हणविणारा हा कवी एक अग्निकुंड आहे ज्यात कोठेतरी क्रांतीचे बीज लपले आहे.

    ReplyDelete
  2. कृष्णकुमारजी, आभारी आहे.

    ReplyDelete