29 Aug 2010

फ़ुलझडी..........!!!!

फ़ुलझडी..........!!!!


तो....
चार शिष्य,चार चेले, चार चमचे
मागेपुढे चालायला, उदोउदो करायला
कायम आपल्या दावणीला बांधून
स्वतःच स्वतःविषयी लिहिलेले पोवाडे
गाऊन घेतो त्यांचेकडून
आणि एवढ्याशा शिदोरीच्या बळावर
वाढवू पाहतो.... आपल्या श्रेष्ठत्वाच्या कक्षा......!!

ते....
ते भक्तही तल्लीन होतात
लोळवून घेत स्वतःला त्याच्या चरणावर
वारंवार त्याच्या पायाच्या धुळीचा
मस्तकाच्या मध्यभागी टिळा लावत... होतात बेभान
जणू काही त्या चरणाखेरीज अन्य सर्वकाही निस्तेज,निष्प्रभ
अशी स्वतःचीच मनसमजावणी करत... सदासर्वकाळ....!!

क्षणिक का होईना पण अभयतेने
चित्तवेधक ठरत असतेच फ़ुलझडी..........!!!!

                                                            गंगाधर मुटे
............ **.............. **............. **..............**........

No comments:

Post a Comment